नमस्कार!!!
मी सागर सोनावणे. मी माझे एम बी ए इन प्रोडक्शन आणि मटेरिअल्स मॅनेजमेंट क. का वाघअभियांत्रिकी शिक्षण व संशोधन संस्थेतील व्यवस्थापन शास्त्र विभागातून २०११साली पूर्ण केले. मी आरंभीचे साडे चार वर्ष क्रॉम्प्टन ग्रीव्हज या कंपनी मध्ये वरिष्ठ अधिकारी म्हणून जळगाव येथे कार्यरत होतो. सध्या मी क्रॉम्प्टन ग्रीव्हज , गोवा येथे उत्पादन प्रमुख म्हणून कार्यरत आहे .येथे आम्ही ३ अश्वशक्ती चे ३३००० मोटर्स प्रति महिना उत्पादित करतो याचा मला अभिमान आहे. आजच्या स्पर्धात्मक जगात प्रत्येक युवकाला चपळ, कार्यक्षम व सर्वकार्यकुशल असावे लागते. त्याचबरोबर त्याचे वागणे हे नीतिमत्तेला व व्यवसायिकपणाला धरून हवे. तसेच तो एक जबाबदार नागरिक ही हवा असतो.हे सगळे गुण अंगिकारण्यासाठी तसे शिक्षणही घेणे आव्यश्यक आहे. असे शिक्षण मला क का वाघ मध्ये एम बी ए करीत असताना मिळाले. क का वाघ मधील उच्चशिक्षित शिक्षक वर्ग ,सुसज्ज ग्रंथयालये या मुळे मिळणारे यश सोपे झाले.
क का वाघ मध्ये शिक्षण घेत असताना मला नेतृत्व गुण आत्मसात करणे शक्य झाले हे सांगणे अतिशय महत्वाचे आहे आज मी याच मुळे १०० हुन अधिक लोकांचे नेतृत्व करत आहे ज्यांची उत्पादन क्षमता मी २७००० मोटर्स प्रति महिना वरून ३३००० मोटर्स प्रति महिना वर नेवू शकलो आणि त्याचमुळे मला सलग ३ वर्ष कंपनी कडून ड्रीम टीम मेंबर व क्रॉम्प्टन ग्रीव्हज सुपरस्टार हे पुरस्कार मिळाले आहेत.
माझ्या या यशामध्ये क. का वाघअभियांत्रिकी शिक्षण व संशोधन संस्थेतील माझ्या एम बी ए विभागाचा सिंहाचा वाटा आहे.