संकेत खंदारे , व्हाईस प्रेसिडंट - इमर्जिंग टेक अँड प्रॉडक्ट हेड, विनजीत टेकनॉलॉजी प्राव्हेट लिमिटेड , नाशिक संकेत खंदारे यांनी २००६ मध्ये के. के. वाघ इन्स्टीट्युट ऑफ इंजिनिअरींग एज्युकेशन अँड रिसर्च येथून बी. ई. (आयटी इंजिनिअरींग) ची पदवी संपादन केली.पदवी संपादन केल्याबरोबरच त्यांनी विनजीत टेकनॉलॉजी लिमिटेड या अँड्रॉइड अँप व मशीन लर्निंग च्या क्षेत्रात अतिशय नावाजलेल्या कंपनीत काम सुरु केले. सुरुवातीला सॉफ्टवेअर इंजिनिअर आणि त्यानंतर लीड टेक्निकल आर्किटेक्ट म्हणून आपल्या कामाचा ठसा निर्माण केल्यानंतर अतिशय कमी कालावधीत आर अँड डी विभागाचे प्रमुख करण्यात आले. काम करत असतानाच त्यांनी कॉनव्होल्यूशनल न्यूरल नेटवर्क , डीप लर्निंग , मशीन लर्निंग या तांत्रिक विषयांमध्ये नैपुण्य व ज्ञान मिळवत त्याचा कंपनीच्या यशासाठी वापर केला. त्यांच्या या तांत्रिक क्षेत्रातील कामामुळे त्यांना नॅस्कॉम या आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजलेल्या संस्थेकडून गौरवण्यात देखील आले. त्यांच्या तांत्रिक विषयाबरॊबरच व्यवस्थापनाच्या कौशल्यामुळे त्यांना कंपनीत व्हाईस प्रेसिडंट या महत्वाच्या पदाची जबाबदारी देण्यात आली.उपजतच असलेल्या नवीन काही तरी शिकण्याच्या वृत्तीला अनुसरून त्यांनी अगोदर आय. सी. एफ.ए.आय. या संस्थेतून एमबीए व नंतर भारतात अतिशय नावाजलेल्या अशा आय. आय.एम. बेंगलोर या संस्थेतून जनरल मॅनॅजमेण्ट ची पदवी संपादन केली.दरम्यान त्यांना विविध पुरस्कार मिळाले असून शैक्षणिक क्षेत्रात देखील ते विद्यार्थ्यांना विविध तंत्रज्ञानाविषयी मार्गदर्शन करतात.