हके.के.वाघ इन्स्टीट्युट ऑफ इंजिनिअरींग, एज्युकेशन अँड रिसर्च येथून बी.ई. इलेक्ट्रिकल ची प्रथम श्रेणीत पदवी घेतल्यानंतर राहुल २००८ सालापासून इंजिनिअरींग क्षेत्रात कार्यरत असून विविध कंपन्यांमधून काम करत अनुभव घेत आहेत. आज ते रिसर्च अँड डेव्हलपमेंट या क्षेत्रात क्रॉम्टन ग्रीव्हज् लिमिटेड सारख्या नामांकीत उद्योगसमूहात सिनिअर एक्झ्यूकेटीव्ह म्हणून कार्यरत आहे. इलेक्ट्रिकल इंजिनिअरींगचे क्षेत्र विस्तारत असून यामध्ये अनेक संधी उपलब्ध आहे, याचाच प्रत्यय राहुल यांच्या मागील १० वर्षांच्या कारकिर्दीत येतो. सुरवातीला एका छोट्या कंपनीमध्ये अभियंता म्हणून त्यांनी कंपनीच्या ग्राहकांशी संवाद साधत तेथील कामकाजात हातभार लावला. तसेच त्यांच्या वरिष्ठांसोबत अनेक उपक्रमांमध्ये जसे ले-आउट, डिझाईन, असेम्बली यांसारख्या कामांत सहभाग घेऊन अनुभव संपादन केला. स्वतःची प्रगती साधत जेमिनी इन्स्ट्राटेक प्रायव्हेट लिमिटेड नाशिक येथे विपणन अभियंता म्हणून काम केले. निर्यातीवर भर असलेल्या या कंपनीमध्ये आंतर व बाह्य ट्रान्सफॉरमर, कंडेन्सर बुशिंग यांच्या विक्रीमध्ये सहभाग घेतला. या कार्यात त्यांनी ग्राहकांशी थेट संपर्क करून कंपनीच्या विविध उत्पादनांची माहिती देणे, ग्राहकांची असलेली गरज त्यानुसार डिझाईन विभागाकडून तसे उत्पादन बनवून घेणे या कामांचा अनुभव मिळवला. विपणन कार्यकारी अभियंता म्हणून प्रगती साधत त्यांनी क्रॉम्टन ग्रीव्हज लिमिटेड येथे कामास सुरूवात केल्याने त्यांना बढती मिळाली. विविध उत्पादनांच्या जसे की, जी आय एस सरकिट ब्रेकर, जी आय एस डिसकनेक्टर अँड अर्थिंग स्विच या उत्पादनांमध्ये डिझाईनिंगच्या क्षेत्रात ते कार्यरत आहेत. यासाठी विविध कार्यक्षमता आत्मसात करून त्यांनी नैपुण्य मिळवले आहे. क्रॉम्टन ग्रीव्हज लिमिटेडच्या अनेक उत्पादनांच्या डिझायनिंगमध्ये ते सक्रीय असून त्यांनी आत्मसात केलेले कौशल्य ते वापरू शकतात. के.के. वाघ कॉलेजच्या इलेक्ट्रिकल विभागापासून सुरु झालेला हा प्रवास उंच शिखरांकडे झेपावतो आहे.