१९९५ मध्ये के. के. वाघ इन्स्टीट्युट ऑफ इंजिनिअरींग एज्युकेशन अँड रिसर्च येथून बी. ई. इलेक्ट्रॉनिक्समध्ये डिग्री घेऊन तेजस यांनी अतिशय वेगळी रिवोलो हायब्रीड टेकनॉलॉजि विकसित केली आणि त्यामध्ये संशोधन करून सध्याच्या जागतिक परिस्थितीला अनुसरून वाहनांच्या तंत्रज्ञानातील काही पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. त्याचबरोबर मायलेज स्टँडर्डचा विचार त्यांनी नव्याने मांडला आहे.
अर्थातच हायब्रीड इलेक्ट्रिक तंत्रज्ञानामध्ये २० हून अधिक पेटंट मिळवले आहेत. या तंत्रज्ञानामुळे इंधनावर चालणारे वाहन हे विद्युत उर्जा स्त्रोतावरही चालवता येऊ शकते. यामध्ये कुठल्याही वाहनाला प्लग इन हायब्रीड इलेक्ट्रिक वेहिकल (पी एच ई वी) मध्ये स्थित्यंतरित करून पर्यावरणपूरक वाहन म्हणून वापरता येऊ शकते. यामध्ये २ उद्दिष्ट्ये साध्य होतात. ती म्हणजे वाहनाची वाढीव क्षमता वापरात येऊ शकते आणि ती देखील वाजवी दरामध्ये. याशिवाय एक पर्यावरणपूरक पर्याय वाहनधारकाला मिळतो.
या हायब्रीड तंत्रज्ञानामध्ये मोटार आणि इंजिन हे एकाच वेळेस काम करू शकते. इतर इलेक्ट्रिक वाहनांमध्ये बॅटरी संपल्यानंतर वाहन बंद पडण्याची शक्यता असते. परंतु या तंत्रज्ञानानुसार बॅटरी संपल्यानंतरही ते वाहन प्रचलित असलेल्या इंधन पद्धतीवर काम करू शकते. याचे वैशिष्ट्य असे की, हे वाहन घरच्या घरी विद्युत पुरवठ्यावर चार्ज करता येते.
या पद्धतीच्या वाहनांसाठी तेजस यांनी विविध विषयांतील कौशल्य संपादित केले असून यामध्ये वाहन व त्यातील तंत्रज्ञानातील विविध बाबींचा समावेश आहे. या कामासाठी तेजस यांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले असून, यामध्ये