ऋषिकेश जाधव , हेड-प्रॉडक्ट अँड रिसर्च, इएसडीएस प्राव्हेट लिमिटेड , नाशिक ऋषिकेश जाधव यांनी २००८ मध्ये के. के. वाघ इन्स्टीट्युट ऑफ इंजिनिअरींग एज्युकेशन अँड रिसर्च येथून बी. ई. (आयटी इंजिनिअरींग) ची पदवी संपादन केली. पदवी संपादन करत असतानाच अतिशय हुशार असलेल्या ऋषिकेश यांनी पदवीच्या अंतिम वर्षात विशेष श्रेणीत उत्तीर्ण होत प्रथम क्रमांक मिळवला.यानंतर त्यांनी पर्सिस्टन्ट या आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजलेल्या कंपनीत काम करून आपला वेगळा ठसा उमटवला. नेहमीच संशोधनाची आवड असलेल्या ऋषिकेश यांना मात्र वेगळीच संधी खुणावत होती. आपल्या संशोधक वृत्तीला अनुसरून त्यांनी इएसडीएस प्राव्हेट लिमिटेड, नाशिक या क्लाऊड कॉम्पुटिंग मध्ये नावाजलेल्या कंपनीत रिसर्च इंजिनिअर या पदावर काम सुरु केले. स्वतःच्या संशोधक वृत्ती व अथक परिश्रमाच्या जोरावर थोड्याच कालावधीत त्यांना सिनियर रिसर्च इंजिनिअर करण्यात आले.सध्या ते या कंपनीत रिसर्च विभाग प्रमुख या पदावर काम करत आहे.आपल्या कारकिर्दीत त्यांनी क्लाऊड कॉम्पुटिंग मध्ये अतिशय महत्वाचे संशोधन करून टाइम डिटेक्शन ऑफ रिसोर्स रिक्वायमेण्ट अँड ऑटोमॅटिक अडजस्टमेंट्स या संदर्भातले पेटंट मिळवले.याचबरोबर आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या जर्नल मध्ये त्यांचे शोधनिबंध देखील प्रसिद्ध झाले आहे. यादरम्यान त्यांनी पुणे विद्यापीठातून एम. ई. कॉम्पुटर ची देखील पदवी संपादन केली. त्यांना विविध पुरस्कार मिळाले असून शैक्षणिक क्षेत्रात ते विद्यार्थ्यांच्या संशोधन प्रकल्पात देखील मार्गदर्शन करतात.यशाच्या शिखरावर जाऊन देखील त्यानी महाविद्यालयाशी आपले ऋणानुंबंध जपले याचा महाविद्यालयाला सार्थ अभिमान आहे.