Alumni Success Stories

52

उदय वासवानी यांनी बी सी  ए ची पदवी घेतल्यांनंतर के. के. वाघ इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरींग एज्युकेशन अँड रिसर्च येथे एम सी ए ही पदव्युत्तर पदवी घेऊन त्यांनी आपल्या अभियांत्रिकीच्या कारकीर्दीस सुरवात केली.   एम सी ए शिकता शिकता स्वतः मध्ये असलेली जिज्ञासू वृत्ती व नेतृत्व गुण  तसेच "कमवा आणि शिका" या संकल्पनेवर विश्वास ठेवून उदय Microsoft कंपनीचा Microsoft स्टुडन्ट पार्टनर बनला.  त्या अंतर्गत त्याने विविध कार्यशाळा आयोजित केल्या. एम सी ए च्या तिसऱ्या वर्षी कॅम्पस इंटरव्हिव दरम्यान उदय ची नाशिक मधील UMS Tech Labs या नामांकित कंपनीत इंटरशीप साठी निवड झाली. तेथे त्याने डॉट नेट व गुगल टेकनॉलॉजि मध्ये विविध प्रोजेक्ट्स विकसित केले. 

 

Microsoft स्टुडन्ट पार्टनर  आणि UMS Tech Labs मधील इंटरशीप या दोन्ही अनुभवाच्या आणि आत्मविश्वासा च्या जोरावर त्याने २०१६ साली कर्ली बिनरीज लॅब कंपनी ची स्थापना  केली.    कॉम्प्युटर सॉफ्टवेअर मधील विविध प्रणालींमध्ये ते सध्या कंपनीच्या कामकाजाचे नियोजन करतात तसेच कंपनीच्या भावी वाटचालीसाठी सदैव उत्साही व प्रयत्नशील असतात. सि टी ओ म्हणून काम करतांना कंपनीच्या उद्दिष्टांना वित्तीय, बौद्धिक किंवा राजकीय भांडवलाचे व्यावहारिक नियोजन व वापर करण्याची जबाबदारी ते व्यवस्थितपणे सांभाळतात. उदय वासवानी हे कॉम्प्युटर सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेशी संलग्नित असून तेथेही कार्यशील आहेत. के. के. वाघ येथे एम सी ए  ही पदवी मिळवून त्यांनी अभियंता हा दर्जा प्राप्त केला व संगणक अभियांत्रिकी क्षेत्रात ते आपल्या कार्याचा ठसा उमटवीत आहे. 

उदय वासवानीसि ओ - सि टी ओ , कर्ली बिनरीज लॅब ,एल एल पी
Admission Brochure 2024-25 Enquire Now!
Contact