२००३ साली के.के. वाघ इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरींग एज्युकेशन अँड रिसर्चयेथून मेकॅनिकल इंजिनीअरींगची पदवी घेतल्यानंतर, के.टी.एच स्वीडन येथे पदव्युत्तर शिक्षण घेतले व पी.एच.डी ही पदवी घेतली.
२००३ पासून विविध कंपन्यांमध्ये काम करत ऑटोमोटीव्हसिस्टीम,एंबेडेडहार्डवेअर, सॉफ्टवेअर, नेटवर्किंग, फंक्शनलसेफ्टी, सायबरसिक्युरिटीया तांत्रिक विषयांमध्ये नैपुण्य व ज्ञान मिळवत आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये काम केले. यामध्ये के.टी.एच रिसर्च (आरसीवी) कन्सेप्ट व्हेईकल अपग्रेडेड व्हर्जन,इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक सिस्टीम आर्किटेक्चर फॉर के.टी.एच (आरसीवी),पार्शलीऑटोनॉमसड्रायव्हिंगसिस्टीम, मोबाईलरोबोटिक्सप्लॅटफॉर्म असे अनेक विषय त्यांनी विकसित केले. त्यांच्या कामांमध्ये त्यांनी २ पेटंट मिळवले असून यू.एस.व युरोप मधील अनेक कॉन्फरन्स व शैक्षणिक संस्थांमधून त्यांनी व्याख्याने दिली आहेत.
दरम्यान त्यांना विविध पुरस्कार मिळाले असून शैक्षणिक क्षेत्रात ते विद्यार्थ्यांच्या संशोधन प्रकल्पात मार्गदर्शन करतात. त्याचबरोबर अनेक जर्नल्स मधून त्यांचे शोधनिबंध तसेच तंत्रलेखन प्रसिध्द झाले आहे. त्याचबरोबर त्यांनी शैक्षणिक अभ्यासक्रमामध्ये देखील लेखन केलेले आहे.
त्यांच्या विद्वत्त व व्यावसायिक कारकीर्दीमध्ये यशस्वी वाटचाल होतांना के.के वाघ इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरींग एज्युकेशन अँड रिसर्च येथे अभियांत्रिकी शिक्षणाने पाया रुजवला व प्रगत होणाऱ्या तंत्रज्ञानाकडे बघण्याची दृष्टी दिली असे ते आवर्जून सांगतात.