Alumni Success Stories

38

दिप्ती कुलकर्णी के. के. वाघ कॉलेजच्या २००२ च्या कॉम्प्युटर इंजिनीरिंगच्या बॅचमधे प्रथम क्रमांकावर झळकल्या होत्या. त्या सध्या अमेरिकेत न्यू जर्सी येथे स्थायिक आहेत. तिथे बँक ऑफ अमेरिकेत Vice President पदवीवर development टीम च्या मॅनेजर आहेत. बँकेत Asian Leadership Network NJ chapter कम्युनिकेशन्सच्या अध्यक्ष पदावर आहेत. संगणक, कला आणि महिलांच्या विषयी क्षेत्रात अमेरिकेतील कॉलेजमधील विद्यार्थ्यांना त्यांच्या पेपर्स आणि रिसर्च मधे गाईड करतात. त्या आपल्या चित्रकलेतून आणि लिखाण कामातून समाज प्रबोधन करण्याचा प्रयत्न करतात. त

यांनी आपले अनेक  "Solo" चित्रकला प्रदर्शन भारतात आणि अमेरिकेत भरविले आहेत. त्यांची बरीच चित्रं विविध मसिकांच्या मुखपृष्ठांवर झळकली आहेत. मुखपृष्ठांसाठी कॉम्प्युटर ग्राफिक डिझाईन करायची आवड आहे.  दीप्ती कुलकर्णी यांचा विश्वास आहे की जागृती करणे ही उपाय शोधण्याचि पहिली महत्वाची पायरी आहे. आणि त्यांना खात्री आहे की त्यांची चित्रकला महिलांना नक्कीच प्रेरणा देईल. कलेतून सामजिक प्रबोधनासाठी आणि ह्या चित्रांसाठी दीप्ती कुलकर्णी यांना नाशिकमधे आणि अमेरिकेत अनेक पुरस्कार मिळाले. त्यांच्या चित्रकला प्रदर्शनाला मुख्यमंत्री दिवेंद्र फडणवीस, उद्योगमंत्री श्री. सुभाष देसाई ,भारतीय राजदूत, अमेरिकेतील राजकीय लोक आणि मराठी कलाकारांनी भेट दिली होती.  

जुलै 2015 मधे दीप्ती कुलकर्णी यांचे "वूमन एम्पॉवरमेंट" चे चार दिवसांचे सोलो चित्रकला प्रदर्शन बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या अधिवेशनामधे कॅलिफोर्नियाच्या लॉस एंजेलीस शहरात भरविण्यात आले. दीप्ती कुलकर्णी यानी मुख्य मंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांना व अन्य मान्यवरांना आपल्या "वूमन एम्पॉवरमेंट" च्या चित्रांची माहिती दिली व कलेमधून जन जागृती बद्दल आपले विचार संगितले. 

 

सर्व मान्यवरांनी व लोकानी दीप्ती कुलकर्णी यांच्या कलेचे व ह्या विषयाबद्दल जागृती करण्याच्या कार्याला उत्तम प्रतिसाद दिला. "मी स्वत:ला जागतिक नागरिक मानते. स्त्रियांवरील अत्याचार या जागतिक समस्या आहेत. म्हणूनच हे चित्रं किंवा कविता एका विशिष्ठ जाती, धर्म, देश आणि कम्युनिटी साठी नसून humanity साठी आहे.", असे त्यांचे म्हणणे आहे. 

 

त्यांचे म्हणणे आहे की कुठल्याही यशस्वी कार्यासाठी पाया मजबूत असणे महत्वाचे आहे. के. के. वाघ कॉलेजने इंजिनीरिंगचाच नव्हे तर नैतिक आणि सामाजिक जाणिवेचा पाया रुजविला. कॉलेजने कायमच एक पाठबळ आणि आत्मविश्वास दिला. पेपर प्रेसेंटेशन्स, technical talks आणि events organizations च्या पण अनेक संधी दिल्या. यामुळे संगणक क्षेत्रातच नव्हे तर कला क्षेत्रात सुद्धा उपयोग झाला. Ideation आणि Innovation हे कुठल्याही क्षेत्रात creative thinking ने करता येते. तर कॉलेज त्या creativity ला सुद्धा वाव देते. 

दिप्ती कुलकर्णीके. के. वाघ कॉलेज ने इंजिनीरिंगचाच नव्हे तर नैतिक आणि सामाजिक जाणिवेचा पाया रुजविला
Admission Brochure 2024-25 Enquire Now!
Contact